आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी,

राजधानी मुंबई

मुंबई  : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात  केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी. घटनेच्या अनुषंगाने  शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे [ Dr Neelam Gorhe ] यांनी सांगितले आहे.

आर्वी पोलीस ठाण्यात घटनेबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे.

 

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अखत्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पीडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी  निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *