सार्थ आयुष्यासाठी मित्राचं स्थान…SAAY pasaaydan

(Last Updated On: September 28, 2020)

आपल्याला धनवान बनायचं आहे तर आपल्याला धनवान लोकांसोबत राहायला पाहिजे. असं करून आपण त्यांच्यासारखा विचार करायला आणि त्यांच्यासारखं काम करायला लागतो आणि होऊ शकते,की आपणही धनवान होऊ.आपल्याला धावपटू बनायचं आहे तर आपल्याला धावपटूसोबत राहायला पाहिजे.अशाप्रकारे आपण त्यांच्यासारखे जीवन जगायला प्रेरित होऊ.
आपण बघू,की त्यानंतर आपण जास्त कसरत करत आहोत,स्वत:ला बलशाली करत आहोत,आहारावर जास्त लक्ष देत आहोत आणि धावण्याचा प्रयास करत आहोत.आपल्याला लेखक बनायचं आहे तर आपल्याला लेखकांच्या सोबत राहायला पाहिजे आणि त्या कलेचा अनुकरण करायला प्रेरणा घ्यायला पाहिजे.
आपण अध्यात्मिक रूपात विकसित होऊ इच्छितो,तर आपल्याला अशा लोकांची सोबत करायला हवी, जी अध्यात्मिक रूपात विकसित झालेली आहेत.अशा लोकांच्या सोबतीत आपण आत्मा-परमात्माच्या विचारांत जास्त वेळ देऊ,अध्यात्मिक विषयांवर बोलू आणि अध्यात्मिक प्रयत्न करू. आपण अशा व्यक्तंीची सोबत करतो, जे ध्यान-अभ्यास करतात, तर होऊ शकते की आपण ध्यान-साधना करायला लागू.आपण अशा लोकांच्या सोबतीत राहतो जे सदाचारी जीवन जगतात आणि सद्गुणांना महत्त्व देतात तर आपण सुद्धा तसेच जगायला लागतो.आपल्याला आपल्या सोबतीवर लक्ष द्यायला हवे.
काय आपण असे मित्र शोधले आहेत,की जे स्वत:च्या विकासासाठी आपल्याला चुकीच्या मार्गाकडे नेत आहेत की आपण असे मित्र शोधले आहेत जे आपल्याला अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मदत करतात? जेव्हा आपल्याला ऊब हवी असते.
आपण आगीजवळ तेव्हा बसतो, जेव्हा आपल्याला गार व्हायचे असते,आपण बर्फाच्या लादीजवळ किंवा वातानुकूलमध्ये बसतो. अध्यात्मिक जीवन जगू इच्छितो, तर आपण अध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती शोधून त्यांची सोबत करू शकतो. सौभाग्याने आपल्याला असे सोबती मिळाले, की ज्यांनी अध्यात्मिक अनुभव प्राप्त केलेला आहे तर ती सोबत खूपच चांगली आहे. अशा व्यक्तींमधून अध्यात्म चारी दिशांमध्ये प्रसारित होते,जेणेकरून आपले अध्यात्म जागृत होऊ शकते. अशा व्यक्ती जवळ येवून आपले लक्ष जीवनाच्या अध्यात्मिक मूल्यांवर जाते. तिकडच्या वातावरणाचा सरळ आत्माबरोबर संपर्क होतो.
जो कोण आपल्या आत्माला जाणून घेतो, त्याच्याकडे आपली आत्मा खेचली जाते. त्याची चुंबकीय शक्ती आपल्याला अध्यात्माकडे खेचते आणि आपले लक्ष अंतरीच्या अध्यात्मिक खजिन्यांकडे टिकून राहते.आपण ध्यान,अभ्यासात सुधार आणू इच्छतो तर विचार करायला हवा की आपण वेळ कसा घालवतो. अशा व्यक्तीबरोबर वेळ घालवतो,जे अध्यात्मिक रूपात जागृत आहेत आणि अध्यात्मामध्ये रुची ठेवतात, तर दिसून येईल की आपले ध्यान अधिक एकाग्र राहते आणि ध्यान-अभ्यासामध्ये यश मिळते. आपल्या सोबतीला तर्कशक्तीने निवडल्यावर आपल्याला अध्यात्मिक मार्गावर यश मिळण्यास मदत मिळेल.

*****

One thought on “सार्थ आयुष्यासाठी मित्राचं स्थान…SAAY pasaaydan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *