अबब…पेट्रोलची दरवाढ पाहा

(Last Updated On: June 21, 2020)

नवी दिल्ली : मागील १२ दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सुरू असलेली दरवाढ आज १९ जून रोजी सलग तेराव्या दिवशीही कायम आहे. शुक्रवारी पेट्रोल 0.56 रुपयांनी, तर डिझेल 0.63 रुपयांनी महाग झाले आहेत.
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.37 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. डिझेलची किंमत 77.06 रुपये प्रतिलिटर झाली आहे. मागील 7 जूनपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये 7.11 रुपये आणि डिझेलमध्ये 7.69 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे.
देशाची आर्थिक तसेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात पेट्रोलचे दर 85.21 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर 75.53 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 81.22 रुपये प्रतिलिटर आणि 74.77 रुपये इतके झाले आहेत. कोलकाता येथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे 80.13 रुपये प्रतिलिटर आणि 72.53 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर 80.91 रुपये प्रतिलिटर, डिझेलचे दर 73.28 रुपए प्रति लिटरवर गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *