Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा ना आलास तू ना दिसलास तू सांज सरून गेली सखया रात थकली…निजली

ना आलास तू ना दिसलास तू सांज सरून गेली सखया रात थकली…निजली

673

ना आलास तू

ना आलास तू
ना दिसलास तू
सांज सरून गेली
सखया रात थकली…निजली

बेरंग ऋतू स्वप्नात रंगले
चांदण्यात कसे मी अंधारले
मोसमी क्षणांनी कुरवाळले छळले
ना फुलल्या कळ्या कधीही
सांज सरून गेली
सखया रात थकली…निजली

म्हणालास तू आवर वेड्या जीवा
अन् दे दिलासा मना
मी तुझा तुझाच आहे
मग का अविरत दु:ख वाही
सांज सरून गेली
सखया रात थकली…निजली

संजय मुंदलकर