गोल्डन पिकॉक पुरस्काराच्या शर्यतीत वीस देशांचे १५ चित्रपट

पीक शिवार राष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षीच्या महोत्सवात गोल्डन पिकॉक पुरस्कार विभागात वीस देशांचे १५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. या विभागासाठी सातशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या.अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि छायाचित्रणकार जॉन बेली हे परिक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील, तर फ्रान्सचे चित्रपट दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो, चीनचे चित्रपट दिग्दर्शक झँग यांग, आणि ब्रिटनच्या चित्रपट दिग्दर्शिका लीन रामसे हे तीघे परिक्षक मंडळाचे सदस्य असतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय परिक्षक सदस्यांमध्ये भारताकडून रमेश सिप्पी प्रतिनिधित्व करतील असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *