Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना

69

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगाव येथे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.                                                                                      केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी. ए. बोटे, डिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते.                                                                                              केंद्राची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ अशी असून याकरिता नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या केंद्राचा संपर्क क्रमांक ०२५७-२२२४२६८ असा आहे. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधल्यास संबंधितांना माहिती मिळू शकेल. कोविड १९ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही साधनांचा तुटवडा असल्यास, वैयक्तिक आरोग्य विषयक समस्या असल्यास, इतर अडचणी वा समस्या उद्भवल्यास किंवा काही शंका असल्यास त्वरीत समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री.बोटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here