Home राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये

390

नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी  अचानक लेहमध्ये पोहोचले.                                                                                                                            भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही आहे की, “देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.” पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.