Home राष्ट्रीय जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलल्या

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलल्या

278

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई [JEE] आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी एनईईटी [NEET] या दोन्ही परीक्षांची तारीख दुसºयांदा पुढे ढकलली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबरला होणार आहे. 18 ते 23 जुलै रोजी नियोजित असलेली जेईई मुख्य परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबर आणि अ‍ॅडव्हान्स 27 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 4 जुलै ते 15 जुलैदरम्यान विद्यार्थी आॅनलाईन अर्ज दाखल करू शकतील.
दरम्यान, जेईई परीक्षांमार्फत देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो, तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाºया एनईईटी परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here