गुरुंचे महत्त्व…SAAY pasaaydan

(Last Updated On: September 28, 2020)

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला अशा व्यक्तिकडे जावे लागेल, जी अध्यात्म्यात पारंगत आहे. एक पूर्ण सद्गुरु अध्यात्मिकात पारंगत असतात. सुदैवाने प्रत्येक वेळी या पृथ्वीतलावर एक ना एक पूर्ण सद्गुरु अस्तित्वात असतात, जे आपल्याला आपल्यातील आत्मिक शक्तीशी जोडण्यासाठी मदत करतात. प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वीवर येत असतात, जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.
संतमताचे संत सांगतात की, परमेश्वराची सत्ता ही कुठल्या न कुठल्या मानवी देहातून कार्यरत असते. मनुष्य इतर मनुष्यांकडूनच शिकत असतो. संत या जगात येतात आपल्याशी आपल्या स्तरावर येऊन बोलण्यासाठी, अंतरिक अनुभव प्राप्त करण्याची पद्धत आपल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यासाठी जेणेकरून ते आम्हालाही आंतरिक अनुभव करून देऊ शकतील. केवळ बोलून किंवा वाचून अध्यात्म शिकता येत नाही. हे केवळ वैयक्तिक अनुभवातूनच शिकले जाऊ शकते. आणि असा अनुभव मात्र आपल्याला संपूर्ण सद्गुरुच देऊ शकतात.
शिष्याला नामदान दिल्यानंतर सद्गुरु सदैव शिष्यसोबत असतात व त्याला सर्व प्रकारे सुरक्षित ठेवतात. सद्गुरुंचे हे संरक्षण केवळ या जगापुरते मर्यादित नसून त्यानंतरही ते कायम राहते. सद्गुरु शिष्याच्या कमार्चा भार आपल्याकडे घेतात आणि सदैव त्याच्या अवतीभवती असतात. शिष्याच्या शेवटच्या काळातही ते त्याच्याबरोबर राहून पुढील मंडळांमध्ये त्याचे मार्गदर्शक होतात. त्यावेळी सद्गुरु शिष्याच्या अंतरी प्रकट होऊन अत्यंत प्रेमाने त्याला अलिंगन देऊन प्रकाशाच्या मध्ये घेऊन जातात.
करुणा व ममतेने ओतप्रोत सद्गुरु आम्हाला संकटात पाहू शकत नाहीत. सद्गुरु या जागी आम्हाला कर्माच्या चिखलपासून दूर राहण्याची शिकवण देण्यासाठी येतात, आम्ही कर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा असते की, ज्यामध्ये अडकून आपण पुन्हा पुन्हा या जगात येत असतो. त्यांची इच्छा असते की आपण आपल्या खºया पित्याच्या घरी परत जावे, जे कोणताही क्लेश किंवा मृत्यू नाही. आमच्या जीवन काळात देखील  सद्गुरु आमचे अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण करतात. तेआमच्यावर विविध प्रकारे करत असणाºया कृपांचे, मदतीचे आम्हाला ज्ञान देखील नसते. जोपर्यंत आम्ही परमात्म्या सोबत एकरुप होत नाही, तोपर्यंत आमची हर प्रकारे मदत करण्यासाठी सद्गुरु सदैव आमच्यासोबत राहतात. एकदा का पूर्ण सद्गुरुद्वारे नामदान मिळाले की सद्गुरु आपल्या शिवनेत्रावर विराजमान होतात व जीवनातील प्रत्येक घडामोडीमध्ये आमची मदत करतात.      सद्गुरु हे आपले खरे नि:स्वाथ मदतगार असतात, मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला,नाव किंवा कीर्ती त्यांना नको असते. ते आपल्याला मदत करतात़ कारण ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात़, त्यांचे स्वत:चे अंत:करण प्रभूप्रेमाने ओतप्रोत भरलेले असते.
जर आपल्याला या मानव देहाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे असेल आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी एकरुप करायचे असेल, तर आपल्याला पूर्ण सद्गुरुंच्याच चरणी जावे लागेल. आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की वर्तमानक्षणी या जगी आस्तित्वात असणाºया पूर्ण सद्गुरुंच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर घेउन जावे, जेणेकरून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण आपली अध्यात्मिक यात्रा शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकू आणि आपल्या जनधामी पोहचून कायमस्वरुपी परमात्म्यामध्ये लीन होऊ.

*****

 

 

One thought on “गुरुंचे महत्त्व…SAAY pasaaydan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *