Home राष्ट्रीय सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी

सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी

347

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई [CBSC] इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम चालू अर्थात 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 30 टक्के कमी करण्यात येणार असून महत्त्वाचा भागच अभ्यासक्रमात असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. नॅशनल काउंसिल आॅफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे.
रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवर सांगितले की, सीबीएसईला आम्ही याआधीच अभ्यासक्रम तयार करताना यामध्ये विद्यार्थ्यांचा ताण वाढणार नाही यासाठी अभ्यासक्रम कमी करावा अशा सूचना केली होती. यासाठी शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासक्रम कमी करण्यासाठी काही सूचना, मार्गदर्शन मागितले होते. यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विषयांतील मुख्य गाभा (कन्सेप्ट) न वगळता अभ्यासक्रम तर्कसंगत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here