Home राजधानी मुंबई विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

328

मुंबई : हिंदी चित्रपटांतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 81वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता जावेद तसेच नावेद जाफरी यांचे ते वडिल होत.
‘शोले’मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले (1975), ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना (1994), एजन्ट विनोद, पुराना मंदिर, कुर्बानी, शहंनशाह, बाँबे टू गोवा, चायना गेट अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
जगदीप यांचा जन्म ब्रिटिश इंडियातील दातिया येथे 29 मार्च 1939 रोजी झाला होता. सय्यद अहमद जाफरी असे त्यांचे खरे नाव होते. सन 1951 मधील अफसाना चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय सुरू केला. 70 आणि 80 च्या दशकातल्या चित्रपटांमधील त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. नायक ते विनोदी अभिनेता असा त्यांचा खूप मोठा प्रवास होता. जगदीप यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम काम केले आहे. त्यांचे तीन विवाह झाले होते़ त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here