Home उपराजधानी नागपूर मंगेश कडव याला पांढराबोडी परिसरात अटक

मंगेश कडव याला पांढराबोडी परिसरात अटक

393

नागपूर: खंडणीसह पाच गुन्ह्यांमध्ये फरार असलेला नागपूर शिवसेनेचा नेता मंगेश कडव याला अखेर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अटक केली. फरार असताना मंगेश कडव कोणाच्या आश्रयाला गेला. दरम्यान, फरार झाल्यानंतर त्याला आश्रय देणाºयांचा शोध घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
पत्नी डॉ. रुचिता कडव हिला अटक झाल्यानंतर कडव आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बुधवारी तो न्यायालयात आत्मसमर्पण करणार असल्याचीही चर्चा असताना सायंकाळपर्यंत पोलिस न्यायालय परिसरात होते. मात्र तो आला नाही. यादरम्यान तो अंबाझरीतील पांढराबोडी भागात असल्याची माहिती गुन्ह ेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. त्यानंतर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक भारत क्षीरसागर, सहाय्यक निरीक्षक ईश्वर जगदाळे, किरण चौगुले ,सहाय्यक उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, किशोर महंत, सतीश मेश्राम, संजय पांडे, मनीष पराये, प्रशांत देशमुख, सतीश ठाकूर, आशीष चौरे, अश्लेंद्र शुक्ला यांच्यासह सहकाºयांनी पांढराबोडी भागात सापळा रचला. तो आॅटोरिक्षातून जाताना दिसून येताच पाठलाग करून कडव याला अटक केली.
दरम्यान, त्याच्या विरोधात अंबाझरी पोलिस ठाणे, सक्करदरा, हुडकेश्वर, बजाननगर व सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.