Home BREAKING NEWS विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू

241

विकास दुबे : शुक्रवार ते शुक्रवार

नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उज्जैन-कानपूर मार्गावर साडेसहाच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केल्यानंतर कानपुरात आणले जात होते. मार्गात उत्तर प्रदेश एसटीएफचे वाहन उलटले़ यावेळी दुबेने पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले़ मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने एन्काऊंटरमध्ये तो मारल्या गेला़ यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तत्पूर्वी पोलिसांनी गुरुवारी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. येथील महाकाल मंदिरातून तो पोलिसांसमक्ष शरणागती पत्करणार असल्याची माहिती होती़ मात्र, त्याआधीच माहिती मिळताच मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. मंदिराच्या सुरक्षारक्षकाने त्याच्याबाबत माहिती दिली होती. जवळपास 10 राज्यातील पोलिस पथक त्याचा शोध घेत होते. (छायाचित्र सौजन्य : एएनआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here