Home राष्ट्रीय हेही वाचा : विकास दुबेचा प्रवास शुक्रवार ते शुक्रवार

हेही वाचा : विकास दुबेचा प्रवास शुक्रवार ते शुक्रवार

408

नवी दिल्ली : मागील शुक्रवारी (3 जुलै 2020) पोलिसांवर भ्याड करून पळालेला विकास दुबे यांने आज पुन्हा शुक्रवारीच पोलिसांवर पिस्तुल ताणून पळण्याचा प्रयत्न केला़ मात्र, एन्काऊंटरमध्ये त्याला ठार मारण्यात आले.
विकास दुबेला पकडण्यासाठी शुक्रवारी, 3 जुलै 2020 रोजीच्या रात्री पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहोचली. पोलिस पोहचल्याची माहिती मिळाल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलिस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर तीन बाजूंनी अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिस शहीद झाले. यानंतर तो पसार झाला. तेव्हापासून उत्तर पोलिसांचे तब्बल 40 पथक त्याचा शोध घेत होते़ तो नेपाळ पळाल्याचाही संशय व्यक्त होत होता. यासह सुमारे 10 राज्यांची पोलिस त्याच्या शोधासाठी प्रयत्न करत होते. शोधादरम्यान पोलिस पथकाने दुबेच्या अनेक सहकाºयांना ताब्यात घेतले होते. शेजारच्या हरयाणा राज्यातील फरिदाबाद येथेही तो पाहण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तो कानपूरपासून जवळपास 675 किमी अंतरावर अचानक मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दिसून आला. मैं विकास दुबे, कानपूरवाला…अशी ओळख त्याने यावेळी दिली होती. यानंतर स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एसटीएफने तब्बल 154 तासांनंतर त्याला अटक केली. मागील एक आठवड्यात त्याने तीन राज्ये पालथी घातली. मात्र, आज शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणाºया प्रयत्नात त्याचा खात्मा करण्यात आला. शुक्रवार ते शुक्रवार असा त्याचा आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला आहे.
विकास दुबे कोण?
विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरू गावचा आहे. त्यात खून, अपहरण, खंडणी, जबरदस्तीने मालमत्तांवर कब्जा करणे, पोलिसांवर हल्ला, अधिकाºयांना धमकी अशा किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत. 2001 मध्ये तर पोलिस ठाण्यात शिरून त्याने भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. या प्रकरणात एकाही पोलिसाची त्याच्याविरोधात न्यायालयात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही. काळात विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली. याच काळात सरकारी कंत्राटापासून ते शैक्षणिक संस्था उभी करून कोट्यवधींची संपत्ती उभी केली. बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभे राहू शकत नव्हते.
मागील 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नसल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेत दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो. आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे जिप सदस्य आहे दुबेला दोन मुले असून एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असून दुसरा कानपूरमध्ये शिकत आहे.