Home मुंबई दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी

307

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात येणार आहे. तसेच, दिव्यांगांसाठी असणाºया कार्यशिक्षण या विषयाचे गुणही सरासरी पद्धतीनेच दिले जातील.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर बाकी होता. सुरुवातीला अनिश्चित काळासाठी हा पेपर पुढे ढकलण्यात आला; परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पेपर रद्द आला. विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याआधी बारावीची परीक्षा संपली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here