Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मारा कपाळावर हात, चक्क बँकेची बनावट शाखा

मारा कपाळावर हात, चक्क बँकेची बनावट शाखा

147

चेन्नई : तामिळनाडू राज्यात कुडलूर जिल्ह्यातील परूती येथे चक्क स्टेट बँक आॅफ इंडिया अर्थात एसबीआयची बनावट शाखा चालवण्यात येत होती. या प्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी कर्मचाºयाचा मुलगा मुख्य आरोपी कमल बाबू हा अवघा 19 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या संपर्कातील लोकांच्या मदतीने एसबीआयची शाखा सुरू करण्यासाठी संगणक, लॉकर, चालान आणि बनावट कागदपत्रे आणली होती. पनरुती बाजार शाखेच्या नावावर संकेतस्थळ देखील तयार केले असल्याचे आढळून आले. कमल बाबू याने आपले साथीदार ए. कुमार आणि एम मण्णीकम यांच्या मदतीने एप्रिल महिन्यात शाखा उघडली होती.
असा भांडाफोड…
एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजारपेठेत नव्याने उघडलेल्या शाखेची माहिती शहरातील विद्यमान शाखेच्या व्यवस्थापकाला विचारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बनावट शाखेतून घेतलेली पावती एका ग्राहकाने दाखवल्यानंतर व्यवस्थापक आणि इतर अधिकारी बनावट शाखेत धाव घेतली़ यावेळी मूळ बँकेच्या शाखाप्रमाणेच व्यवस्था पाहून सर्वजण चाट पडले. यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here