चित्रपटांचे लोकेशन्स… CINEdeep

(Last Updated On: September 28, 2020)

हिंदी चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर १९९०च्या दशकामध्ये निरनिराळ्या कथानाकांवर आधारित अनेक चित्रपट या काळामध्ये खूप लोकप्रिय झाले. केवळ या कथानकेच चांगली होती असे नाही, तर चित्रपटांमध्ये अभिनय, गाणे, संगीत, नृत्य, कलाकार, छायाचित्रण आणि अर्थातच अतिशय निसर्गरम्य ठिकाणी केले गेलेले चित्रीकरण अतिशय महत्त्वाचे ठरले. एखादा चित्रपट लोकप्रिय होण्यात, प्रेक्षकांची गर्दी खेचून घेण्यात या बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरत असतात.
चांदनी, लम्हे, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, माचिस, जो जीता वही सिकंदर अशा काही चित्रपटांची नावे आपल्याला सांगता येईल. चित्रपटांचे चित्रीकरण ज्या ठिकाणी केले गेले, ती ठिकाणे वास्तविक लोकांच्या थोड्या फार परिचयाची असली, तरी ठिकाणांना खºया अर्थाने लोकप्रियता मिळाली ती चित्रपटांमुळे. ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले, ती ठिकाणे लोकप्रिय झाली आणि पर्यटनस्थळे म्हणून अधिक नावारूपाला आली, असे म्हणता येईल.
डीडीएलजे
१९९० च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख-काजोलच्या डीडीएलजे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ला अमाप लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन खरे तर वीस वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. पण तरीही चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. डीडीएलजेने दर्शकांना इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांपासून पंजाबपर्यंतची भ्रमंती करविली. आता ही सर्वच ठिकाणे लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला आली आहेत. तब्बू आणि चंद्रचूड सिंह यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माचीस’ बद्दलही हेच म्हणता येईल. यात चित्रपटात हिमाचल प्रदेशातील मनाली या पर्यटनस्थळाला आणखी लोकप्रियता मिळवून दिली.
मैने प्यार किया
सलमान आणि भाग्यश्रीच्या सुपरहिट ठरलेल्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील ‘दिल दिवाना…’ गाण्याचे छायाचित्रण उटीमध्ये झाले होते. हे गीत गाजल्यानंतर उटी पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण ठरले होते. त्याचप्रमाणे तमिळ नाडूतील कुन्नूर येथील हिरव्यागार चहाच्या मळ्यांमध्ये ‘हम आप के हैं कौन’ मधील ‘ये मौसम का जादू…’ गाणे चित्रित करण्यात आले होते. आमिर खान अभिनित अतिशय गाजलेल्या ‘जो जीता वही सिकंदर’चे चित्रीकरण देहरादून आणि कोडाई कॅनाल येथे झाले होते. ही दोन्ही ठिकाणे आता पर्यटनस्थळे म्हणून लोकप्रिय आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ ने भूज या ठिकाणाची ओळख प्रेक्षकांना करवून दिली, तर प्रीती झिंटा आणि शाहरुख खानअभिनित ‘दिल से’ ने केरळची लोकप्रियता वाढविली.

 

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *