Home राजधानी मुंबई बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार

बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार

610

मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या यंदाच्या इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. ‘कोरोना लॉकडाऊन’मुळे निकाल उशिरा जाहीर होत आहे. मागीलवर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. यावर्षी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सुमारे 9,923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून नोंदणी झालेली होती, तर जवळपास 3, 036 केंद्रावरून परीक्षांचे संचालन करण्यात आले. सगळ्यात जास्त विद्यार्थी विज्ञान शाखेचे असून, ही संख्या 5 लाख 85 हजार 736 इतकी आहे. कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत.