पावस…KavyaSuman

(Last Updated On: July 17, 2020)

तुझ्या संगती प्रिय पावस रुसला का
रे सख्या……मन भावन रुसला का

मी ही होते तुझीच तुझी
कोसळल्या सरी अन् सरी
थेंबात दाटे आठवणी किती
श्वास विसरला प्रीतगाणी का
रे सख्या……मन भावन रुसला का

मन माझे बहरात न्हाले
आभाळ धुंद भरून आले
मोहरली ऋतू पालवी शहारली
पाठी पेटला वणवा का
रे सख्या……मन भावन रुसला का

ओलीचिंब अवघी धरणी अवनी
उमलली मृत्तिका गंधीत झाली
उरातली भावना नयनी हुंकारली
जल बिंदू गाली भाळले का
रे सख्या……मन भावन रुसला का

पारिजात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *