Home राष्ट्रीय पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन

233

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…देशाच्या राजकारणात मागील तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 आॅगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 आॅगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. अयोध्येचा विषय न्यायालयात असल्याने त्यांनी वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांनाच अनेकदा भेट दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here