नक्षलभागातील कृषिपंपांना वीज पुरवठ्याबाबत मोठा निर्णय

(Last Updated On: July 20, 2020)

नागपूर : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषिपंपांना16 तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊजार्मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विद्युत विभागाच्या अधिकाºयांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यासह सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रंगारी, गोंदिया परिमंडळाचे श्री. शिरकर, महापारेषणचे संचालक रमाकांत मेश्राम उपस्थित होते.
सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. भाताची रोवणी होत आहे. मात्र, आठ तास वीज पुरवठ्याने शेतीची कामे पूर्ण होत नसल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नक्षलभागातील शेतकºयांना 16 तासांसाठी वीज उपलब्ध झाल्यास त्यांना मदत होईल त्या दृष्टीने ऊर्जा विभागाने कार्यवाही करावी. नक्षलप्रवण भागातील कृषिपंपांना16 तास वीज पुरवठा करण्यासाठी वेगळा प्रस्ताव एका आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री राऊत यांनी दिले. महापारेषणच्या साकोली उपकेंद्र व देवरी उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *