Home राष्ट्रीय गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील

गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील

153
gujrat bjp mp

गांधीनगर : चंद्र्रकांत पाटील अर्थात सीआर पाटील यांची गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटलांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. केवळ एकाच नावाच्या दोन व्यक्ती एकाच पक्षात आहेत.
गुजरात मध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्ताने हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चंद्रकात पाटील 2019 मध्ये लोकसभेवर तिसºयांदा निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने हार्दिक पटेल यांची गुजरात कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. गुजरातमध्ये मोदींचे सर्वात जवळचे खासदार अशी त्यांची ओळख दिल्लीत आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील कामांवर देखरेख ठेवण्याचे काम सीआर पाटील हेच पाहात होते. खासदारांना शासकीय बंगल्याचे वाटप करणाºया गृह समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहात आहे. 1989 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सन 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. दरम्यान, आता गुजरातच्या राजकारणात पटेल विरुद्ध पाटील ही लढाई पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here