Home राजधानी मुंबई मनीषा म्हैसकरांनी पर्यावरण विभागात स्वीकारला पदभार

मनीषा म्हैसकरांनी पर्यावरण विभागात स्वीकारला पदभार

166

मुंबई : पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मनीषा म्हैसकर यांनी आज पदभार स्वीकारला.
बदलत्या हवामानाची व पर्यावरणाची दखल घेण्याचे काम राज्याचा पर्यावरण विभाग विविध योजनांतून व उपक्रमांतून करीत असतो. पर्यावरण रक्षणात शासकीय उपाययोजना, पर्यावरण विषयक कायदे, व्यापक जनजागृती आणि सर्वसामान्य माणसाचा आग्रही सहभाग याकरीता पर्यावरण विभागाचे कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर दिला जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.
म्हैसकर यांनी सन 1992 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला असून राज्यात विविध विभागात कामकाज केले आहे. त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून नावीन्यपूर्ण योजनांतून शासकीय कामकाजाच्या प्रसिद्धीला वेगळी दिशा दिली होती. विशेषत: लोकराज्य मासिकाचे वितरण हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले. गेली पाच वर्षे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम करीत असताना केंद्रीय स्तरावर राज्याला सातत्याने अव्वल स्थानावर नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांचा यापूवीर्चा मुंबई महानगरपालिकेत साडेचार वर्षे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई शहरातील कोविड 19 च्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.