महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांचा शपथविधी

राष्ट्रीय

नवी दिल्ली : देशभरातून 20 राज्यांमध्ये निवडून आलेल्या राज्यसभेच्या 61 नवनिर्वाचित खासदारांचा (तीन महिलांसह) शपथविधी सोहळा कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडला. यावेळी अनुपस्थित खासदारांचा शपथविधी अधिवेशनाच्या वेळी पार पडणार आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (काँग्रेसमधून पक्षांतर), काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली. तर भाजपचे उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षांतर), यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाही केली. काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जून खरगे, झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन, भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे (काँग्रेसमधून पक्षांतर), आरपीआयचे रामदास आठवले यांचाही आज शपथविधी सोहळा पार पडला.
दरम्यान, आजच्या 61 सदस्यांपैकी 43 जणांनी प्रथमच शपथ घेतली आहे. सत्ताधाºयांची सदस्यसंख्या आता 75 हून 86 वर पोहोचली आहे. (छायाचित्र साभार)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *