Home राजधानी मुंबई पाल्यांच्या आॅनलाईन सर्फिंगवर विशेष लक्ष ठेवा

पाल्यांच्या आॅनलाईन सर्फिंगवर विशेष लक्ष ठेवा

86

मुंबई : पाल्यांच्या आॅनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरच्या वतीने करण्यात येत आहे.
विशेष करून सात ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांनी आपले पाल्य आॅनलाईन सर्फिंग करताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. ते कुणाशी आॅनलाईन गप्पा करत असतील तर समोरची व्यक्तीबाबत माहिती करून घ्या़ स्वत: सुद्धा पोर्नोग्राफिक संकेतस्थळावर जाणे टाळा. कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी आॅनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देण्याचे टाळा़ त्यांच्या आॅनलाईन खरेदीचे सर्व व्यवहार तपासून बघा. आॅनलाईन घोटाळा वा आॅनलाईन रॅकेटमध्ये अडकले वा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनल्याचे आढळून आल्यास तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा. तसेच, केंद्र व राज्य सरकारचे नियम व आदेशाचे पालन करा. गरज नसल्यास घराच्या बाहेर पडू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.