Home रानशिवार अमेरिकेत भूकंपानंतर त्सुनामीची भीती

अमेरिकेत भूकंपानंतर त्सुनामीची भीती

228

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अलास्का समुद्रकिनाºयाजवळ रिश्टर स्केलवरील ७.८ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला असून केंद्रबिंदू ठिकाणापासून ३०० किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
अँकोरेजपासून ५०० मैलांवर बुधवारी सकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी) सौम्य स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून ६० मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३०० किमीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे, असे पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे. शेकडो मैल परिसरातील जमीन हादरली असून घरांमधील वस्तू जोरजोरात हलत होत्या, असे स्थानिकांनी सांगितले.
सन १९६४ मध्ये अलास्कामध्ये ९.२ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता. यात २५० हून अधिक जणांना प्राण गमावावा लागला होता.