नवी दिल्ली: भारताने आज तत्काळ प्रतिसाद (क्विक रिस्पॉन्स) देणारे
आणि पूर्णपणे स्वदेशी ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे.ध्रुवास्त्रची चाचणी ओदिशामधील बालासोर येथे करण्यात आली. त्याची झेप घेण्याची क्षेत्रमर्यादा चार ते सात किलोमीटर इतकी आहे. ही चाचणी नुकतीच हेलिकॉप्टर विना करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओद्वारा बनवलेल्या ध्रुवास्त्रचे अगोदरचे नाव ‘नाग’ असे होते.