Home उपराजधानी नागपूर कोरोनामुळे मृत्यूचा असाही भयाण चेहरा

कोरोनामुळे मृत्यूचा असाही भयाण चेहरा

196

कोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक?

नागपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा मृत्यूबाबतचा भयाण असा चेहरा मागील काही दिवसांत पाहावयास मिळाला आहे़ अख्खे कुटुंबे उध्वस्त होत आहेत. मानवीसंवेदना [ human sense ] बधीर करणाºया या दोन प्रमुख दुर्घटना झारखंड आणि महाराष्ट्रात घडल्या आहेत. एका कुटुंबात सलग सहाजणांचा, तर दुसºया घटनेत तीन भावांना प्राणास मुकावे लागले. कोरोना काळातील किंबहुना जगात सुद्धा असल्या स्वरुपाच्या पहिल्याच घटना घडल्या असाव्यात.
वृत्तसंस्थांनुसार, झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील आई आणि पाच मुलांचा एकापाठोपाठ कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचही मुलांना लागण झाली. यातील एकाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. ही सहा भावंडे असून, एक मुलगा दिल्लीत राहतो. माहितीनुसार, 88 वर्षीय महिलेने एका विवाहसोहळ्यानिमित्ताने 29 जून रोजी दिल्लीत हजेरी लावली होती. घरी परतल्यानंतर त्या आजारी पडल्या. त्यांना 29 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु 4 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाला. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. या मृत्यूनंतर कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. यावेळी 65 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 10 जुलै रोजी मुलाचा मृत्यू झाला. दुसºयाच दिवशी 67 वर्षांच्या दुसºया मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिसºया दिवशी तिसरा मुलगाही मृत्यू पावला. आधीच फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या पाचव्या कोरोना पॉझिटिव्ह मुलगा 16 जुलै रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावला. तसेच, 70 वर्षीय चौथ्या क्रमांकाच्या मुलाला 13 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 19 जुलै रोजी त्याने जगाचा निरोप घेतला घेतला. केवळ 15 दिवसांत (दोन आठवड्यात) एकाच कुटुंबातील एकूण सहाजणांना कोरोनाने जग सोडावे लागले. एक आई आणि पाच मुले एका पाठोपाठ नाहीसे झाले.
याशिवाय महाराष्ट्रातील पुण्यातही 12 ते 18 जुलै या कालावधीत तीन भावांचा मृत्यू झाला. कुटुंबातील अन्य दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here