कोरोनापासून बचावासाठी मास्क का आवश्यक?

उपराजधानी नागपूर

नागपूर : बोलताना, खोकताना वा शिंकताना आपल्या तोंडातून वा नाकातून हवेत उडणारे तुषार रोखण्यात मास्क (चेहरा आच्छादक) महत्त्वाची भूमिका निभावत आहे. जनजागृतीमुळे भारताच्या शहरी भागातील 76 टक्के लोक मास्कचा उपयोग करू लागले आहेत, असे जागतिकद दर्जाची सर्वेक्षण संस्था ‘इप्सॉस’ ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने वापरल्यास मास्कमुळेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.
जगातील अनेक देश कोरोना लशीच्या संशोधनावर काम करत आहेत. कदाचित त्यासाठी नवे वर्षही उजाडेल़ मात्र, तोपर्यंत संसर्ग रोखणे आणि जीव वाचवणे इतकेच आपल्या हाती आहे. म्हणून मोठ्या गांभीर्याने मास्कच्या वापराकडे संपूर्ण जगाने बघितले पाहिजे. संसर्ग रोखायचा असल्यास सरकारने आखून दिलेल्या निर्देशानुसार योग्य पद्धतीने मास्क घालणे जरुरी आहे. पद्धत अयोग्य असेल, तर संसर्गापासून ठेवणारा मास्क अडचणी उभ्या करू शकतो. मास्क घालण्याच्या योग्य पद्धतीबाबत आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. याशिवाय दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचे अंतर, सतत हात धुणे, मास्क व चेहºयाला हात न लावणे आदी सवयी पाळणे गरजेचे असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
काही सूचना
मास्क घालण्यापूर्वी हात स्वछ धुवा, तो फाटलेला नसावा, सुती कपड्यापासून तयार केलेला असावा, मेटल पीसकडील भाग वर असावा, रंगीत भाग बाहेर असावा, मेटल पीस नाकावर घ्यावा, तोंड, नाक व हनुवटी पूर्ण झाकणे गरजेचे, संपूर्ण चेहºयावर लावावा,मास्कला वारंवार हात लावणे टाळावे, मास्कला कानाच्या मागून काढावा, काढल्यानंतर हात स्वछ धुणे अपेक्षित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *