Home उपराजधानी नागपूर नागपुरात शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू

नागपुरात शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू

159

नागपूर : नागपूर महानगरपालिकाने उद्या शनिवारी आणि परवा रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यानुसार शहरवासीयांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी बेजबाबदारीने वागणे थांबवले नाही तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे दिला होता.
मागील मार्च महिन्यांपासून देशात कोरोनाचे थैमान आहे. देशासह राज्यातही लॉकडाऊनचे चार टप्पे लागू करण्यात आले होते. मात्र, अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी महामारीचा प्रादुर्भाव काही थांबलेला नाही. नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी बजावण्यात येत आहे; परंतु सरकारच्या नियमांना वेळोवेळी नागरिकांकडून हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून आले़ नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संपूर्ण प्रकाराला बेजबाबदारपणे वागणारे नागरिकच कारणीभूत आहेत. नियमांचे पालन होणार नसेल तर पुन्हा लॉकडाऊनसोबतच कडक संचारबंदी लागू करण्यात येईल. नाईलाजाने तसा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
दरम्यान, अनलॉकच्या अनेक सकाळ संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवता बाहेर फिरावयास पडत आहेत़ मास्क चाही वापर करत नसल्याचे अनेक वस्त्यांतून दिसून येत आहे. लहान मुले खेळावयास बाहेर रस्त्यावर येत असून त्यांचे पालन अक्षम्य अशा चुका करत आहेत़ कारण या मुलांना कोणत्याही सुरक्षाविना बाहेर पडू दिले जात आहे.               (ओळ : सरकारच्या आवाहनावरून 22 मार्च 2020 रोजी नागपुरात पाळलेल्या जनता कर्फ्यूदरम्यानचे छायाचित्र. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here