Home राष्ट्रीय नो मास्क, तर भोगा दोन वर्षांचा तुरुंगवास

नो मास्क, तर भोगा दोन वर्षांचा तुरुंगवास

74

रांची : झारखंडमध्ये आता मास्क घातला नाही तर एक लाख रुपयांचा दंड आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.
कोरोना संकटकाळात देशातील अनेक राज्यांनी नागरिकांच्या सुरक्षासाठी वेगवेगळे नियम लावत आहे. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. काही राज्यांमध्ये तर खूपच जास्त नियम कडक करण्यात आले आहेत. यातच आता झारखंड मंत्रिमंडळाने साथरोग अध्यादेश 2020 अंशत: मंजूर केला आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या चढत्या आकड्यांचा आलेख पाहून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी सांगितले, की अजून अध्यादेश पूर्णत: पारित झालेला नाही. दंडाविषयी सांगायचे झाल्यास यात कुणी दोषी आढळल्यानंतर हा दंड आकारण्यात येईल. आमचे सरकार पूर्ण जागरुकतेने कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे.