Home राजधानी मुंबई राज्यात विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

राज्यात विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

145

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणनमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. मागील 10 वर्षांच्या काळात झाली नसलेली विक्रमी खरेदी यंदा झाल्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.
खरेदीचे एकूण मूल्य 11 लाख 776.89 कोटी रुपये असून आतापर्यंत 11 हजार 29.47 कोटी इतकी रक्कम शेतकºयांना अदा करण्यात आली आहे. तसेच, सीसीआयने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोविड-19 च्या प्रादुर्भावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल कापूस खरेदी अशा प्रकारे एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.
कोविड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकºयांचा कल शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकºयांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here