Home राजधानी मुंबई मृत्यूदर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट : मुख्यमंत्री

मृत्यूदर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट : मुख्यमंत्री

56

मुंबई : शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.                                                                            मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.                                                                                                                            डॉ तात्याराव लहाने यांनी सूत्रसंचालन केले. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक,  डॉ राहुल पंडित, डॉ शशांक जोशी , डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी उपचाराविषयी सूचना केल्या. मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here