एका लग्नाची पत्रिका…Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली… आणि मग काय बंट्याला ते फार रोमँटिक वाटलं…
.
.
.
वस्तरा गळ्यावर असताना तिनं विचारलं…
.
.
.
…ही आसावरी कोण रे?
***
आज सकाळी मला एका लग्नाची पत्रिका मिळाली. त्यावर श्री. व सौ. च्या बाजूला डब्ल्यूएल/1, डब्ल्यूएल/2 असा उल्लेख केला होता.
त्यावर मी त्यांना फोन करून त्याचा अर्थ विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले, की कार्यक्रमाला केवळ ५० माणसांची परवानगी आहे. आपला नंबर ५१ व ५२ वा आहे. काही कारणांमुळे कोणा दोन माणसांचे येणं रद्द झालं तर आपल्याला यायचं आहे. एक दिवस आधी तुम्हाला सूचना देण्यात येईल. बस्स, तुम्ही तयारीत राहा.
———-
कृपया कुणीही वादळाची माहिती, संदेश आम्हाला पाठवून उगीचच घाबरवू नये. आम्ही लग्न झाल्यापासून वादळ नेमके काय असते हे रोज क्षणाक्षणाला अनुभवत आहोत
.
.
.
एक वादळग्रस्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *