समीर शिंदे यांची किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

उतर महाराष्ट्र

नाशिक: महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नाशिक जिल्हा बैठकीत आज अ‍ॅडव्होकेट समीर शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्य सचिव राजू देसले प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी-शेतमजुरांच्या हक्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय पार पडला. अभियानाचा दुसरा टप्पा यशस्वी होण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली. नाशिक जिल्हा बँकेने नियमित कर्जफेड करणाºयांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे. 2019 मध्ये शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अनुदान अद्याप मिळालेले नाही, त्यासाठी पाठपुरावा करावा. कसत असलेल्या वनजमिनी नावावर करावी. मका खरेदी केंद्रावर खरेदी सुरू ठेवावी. मनरेगाच्या कामात शेतकºयांच्या बांधावरील कामाचा समावेश करावा. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा व्हावा. दुग्धजन्य पदार्थांवरील वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी रद्द करण्यासंबंधी मागण्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय बैठकीत अ‍ॅड. समीर शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्यावर शेतकरी तक्रार निवारण मदतकेंद्राची जबाबदारी सर्वानुमते सोपवण्यात आली. भास्कर शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तातडीने मदतकेंद्र सुरू करून जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे यांनी केले. प्रारंभी किसान सभेचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस हारअर्पण करण्यात आले. तसेच, उपस्थितांनी कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांना आदरांजली अर्पण केली. बैठकीस जिल्हा सचिव देविदास बोपळे, संघटक विजय दराडे, अ‍ॅड. दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, विनायक शिंदे, नामदेव बोराडे, नामदेव राक्षे, दशरथ कोतवाल, शबू पुरकर, लक्ष्मण आहेर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *