Home उपराजधानी नागपूर जनता कर्फ्यू यशस्वी, काही महाभाग रस्त्यांवरच

जनता कर्फ्यू यशस्वी, काही महाभाग रस्त्यांवरच

102

नागपूर: महानगरपालिकाच्या वतीने करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला दोन्ही दिवसांत नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असला तरी काही महाभाग रस्त्यांवर विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. शहरात काही ठिकाणी फळाची आणि औषधांची दुकाने सुरू होती.
केवळ अत्यावश्यक अर्थात वैद्यकीय सेवेशिवाय इतर कामांसाठी घराबाहेर पडता येणार नाही. नागरिकांनी केरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम पाळणे बंधनकारक असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजावले होते. केवळ दुधविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, किराणा दुकाने व इतर सेवांची दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली होती. काही भागात सकाळच्या वेळी किराणा दुकाने सुरू होती.
दरम्यान, काही चौकात पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. जनता कर्फ्यू काळात पोलिस सक्ती करणार नाही. वाद घालणाºयांवर नियमानुसार कारवाईही होईल, असे पोलिस विभागाकडून बजावण्यात आले होते.
मूळात जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वत:साठी पाळलेला कर्फ्यू होय. त्यामुळे यात प्रत्येक नागरिकांचा 100 टक्के सहभाग अपेक्षित होता; परंतु शनिवारी अनेकजण रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले़ यात काही टपोरींच समावेश प्रामुख्याने जाणवला. अनेकांनी डाँक्टर वा औषधी दुकानात जाण्याचा बहाणा सांगितला. शनिवारच्या तुलनेत रविवारी रस्त्यावरील गर्दी फारच कमी होती. 100 टक्के असा दावा करता येणार नाही़ कारण एका दुचाकीवर केवळ एकालाच जाण्याची परवानगी असताना तिघे-तिघेजण बसून वेगवान गाडी चालवत असल्याचे दिसून आले. काही बुलेटवाल्यांनी रस्त्यावर दररोजप्रमाणे इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न केला. काही कार सुद्धा रस्त्यांवर धावताना दिसून आल्या.