Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देशभरातील चित्रपटगृहे खुली करण्यासंबंधी ‘हा’ निर्णय

देशभरातील चित्रपटगृहे खुली करण्यासंबंधी ‘हा’ निर्णय

50

नवी दिल्ली : येत्या १ आॅगस्टपासून देशभरातील चित्रपटगृहे खुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोना संसर्गामुळे समाजजीवन सुरळीत होण्यासाठी लॉकडाऊन आणि अनलॉक अशा मोहिमा सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. अनलॉक-१ पूर्ण जून महिना चालल्यानंतर आता अनलॉक-२ येत्या ३१ जुलैला संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनलॉक-३ साठी एसओपी बनवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. माहितीनुसार, पुढील अनलॉक- ३ मध्ये चित्रपटगृहे उघडण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी शारीरिक दूरतासह (सोशल डिस्टन्सिंग) अन्य कोरोना महामारीसंबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. यात १ आॅगस्टपासून चित्रपटगृहे खुली करण्यासंदर्भात म्हटले आहे.
चित्रपटगृहे खुली करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि चित्रपटगृह मालकांमध्ये अनेक बैठका पार पडल्या. मंत्रालयीन सूत्रानुसार सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह चित्रपटगृह सुरू करावेत. मात्र, त्यासाठी नियमांचे काटेकोरपणे होणे अपेक्षित आहे, तर चित्रपटगृह मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह प्रदर्शनसुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here