घरात राहा हे जनजागृतीसाठी उत्तम गीत : गृहमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात जनजागृतीसाठी घरात राहा हे पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शवणारे यथायोग्य गीत आहे. यामुळे राज्यात जनजागृती होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
घरात राहा या जनजागृतीपर गाण्याचे विमोचन आज मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. सुप्रसिद्ध कलावंत उषा नाडकर्णी, दिग्दर्शक राहुल खंडारे, गीतकार राजेंद्र काणे उपस्थित होते.
सुश्राव्य संगीत नियोजन योग्य चित्रीकरण व समर्पक संदेश याचे सुरेख मिश्रण असलेले गीत आहे. राज्यातील पोलिस करीत असलेली कामे आणि लॉकडाऊनच्या काळातील नागरिकांचे कर्तव्य या गीताद्वारे सांगितले आहे.
चित्रपटक्षेत्रातील आघाडीचे कलावंत गीतातून जनतेला संदेश देत आहेत. त्यामुळे याद्वारे जनजागृतीचा योग्य परिणाम साधला जाईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
गीताची निर्मिती, संकल्पना व गीतकार विलेपार्ले ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे आहेत. त्यांचेही कौतुक गृहमंत्र्यांनी केले. गाण्याचे दिग्दर्शक राहुल देविदास खंडारे ( स्लमडॉग मिलेनियर फेम ) असून संगीत निहीर शेंबेकर यांचे आहे. शंकर महादेवन यांनी गायन केले असून मिक्स मास्टर सिद्धार्थ महादेवन आहे़ यात शंकर महादेवन, विद्या बालन, सचिन खेडेकर, सुमित राघवन, उषा नाडकर्णी, दिलीप जोशी, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग यांनी जनजागृतीचा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *