मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते महाजॉब्ज अ‍ॅपचे लोकार्पण

राजधानी मुंबई

मुंबई : उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या महाजॉब्ज अप्लिकेशनचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यानिमित्ताने उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकºयांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलचे उद्घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल अप्लिकेशन विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले. मोबाईल अ‍ॅपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य होईल़ तसेच, तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळणार आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे श्री. ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *