मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी 1 सप्टेंबरपर्यंत प्रलंबित

(Last Updated On: July 27, 2020)

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी आता 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे राज्य सरकारला आणखी दीड महिनाभराचा वेळ मिळाला आहे. मात्र, त्यापूर्वी 25 आॅगस्ट रोजी तीनपेक्षा जास्त न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मुख्य सुनावणी करायची की नाही याबाबत सुनावणी होईल. दिलासादायक बाब म्हणजे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मराठा आरक्षणालाही स्थगिती देण्यात आलेली नाही.
मराठा आरक्षण प्रकरणावर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सुनावणी झाली. आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते; परंतु व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अडचणी येत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येत होते. वेगवेगळी कागदपत्र सादर करणे कॉन्फरन्सिंगमध्ये अवघड असल्याने सुनावणी प्रत्यक्ष व्हावी, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील पटवालिया यांनी राज्य सरकारच्या वतीने केला. मुकुल रोहतगी यांनीही हीच बाब नमूद केली. कोरोना संकटामुळे सध्या नोकर भरती होत नाही. त्यामुळे हे प्रकरण तातडीने घेण्याची गरज नसल्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *