Home राष्ट्रीय भारतीय शत्रूंचा कर्दनकाळ राफेल येतोय…

भारतीय शत्रूंचा कर्दनकाळ राफेल येतोय…

81

नवी दिल्ली : फ्रान्समधील मरिगनेक हवाईतळावरून पाच राफेल जेट विमाने भारतात येण्यासाठी निघाले आहेत. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष केवळ भारताकडे लागले आहे. ही विमाने रवाना होण्यापूर्वी फ्रान्समध्ये भारतीय दूतावासांनी विमानांसह वायुसेनेच्या वैमानिकांचे छायाचित्र जारी केले आहेत.                                                                              पाचही राफेल भारतात आणल्यानंतर अंबाला हवाईतळावर जाणार असून भारतीय वायुसेनेत सामील करण्यात येईल. सीमेवरील पाकिस्तान, चीनची कोल्हेकुई आणि कट कारस्थाने पाहता ही प्रक्रिया तातडीने काम सुरू होणार आहे. माहितीनुसार, एका आठवड्यात ही युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करण्यात येतील. त्याच्या उड्डाणासाठी एकूण 12 प्रशिक्षित वैमानिके तयार केले आहेत. यापैकी काहीजण राफेल भारतात आणणार आहेत.
दरम्यान, 29 जुलै रोजी ही विमाने देशात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. राफेल सुमारे साज हजार किलोमीटर पार करणार असून 10 तासांचे अंतर पार केल्यानंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) फ्रान्सचा हवाईतळ अलधफरा येथे उतरेल. दुसºया दिवशी ते अंबालाच्या दिशेने उड्डाण करेल.(प्रतिकात्मक छायाचित्र)