Home राजधानी मुंबई 31 जुलैपर्यंत या भागात कोसळणार दमदार पाऊस

31 जुलैपर्यंत या भागात कोसळणार दमदार पाऊस

148

मुंबई : सध्या हिमालय पर्वतरांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारतासह देशाचा मध्य आणि ईशान्य भागात 29 ते 31 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा [heavy rain]  इशारा देण्यात आला आहे.
पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरयाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात 1 आॅगस्टपासूनजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सादर केलेल्या पत्रकात आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. आता श्रावण सुरू झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक होणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी आता पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. पुढील 24 ते 48 तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार, तर 48 तासात मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here