राज्याचे पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून

(Last Updated On: July 28, 2020)

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे जुलैमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन 3 आॅगस्टपासून सुरू होणार होते. मात्र आता ते 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
यंदाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना संसर्गामुळे अधिवेशनाचा मुहूर्त पुढे पुढे सरकत होता. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिले अधिवेशन (अर्थसंकल्पीय अधिवेशन) पूर्ण काळ चालले होते. अधिवेशन सुरू असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे दोन आठवड्यांतच ते गुंडाळावे लागले होते.
अधिवेशनाच्या काळात विधानभवनात लोक गर्दी करतात. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात असतो. तसेच, प्रशासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी अधिक संख्येत असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतक्या लोकांनी एकत्र येणे धोकादायक ठरणार असल्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *