हुश्श…इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी

राजधानी मुंबई

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तो पाहता येणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्याथिर्नी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून त्यांची नोंदणी झाली होती. तसेच, 4 हजार 979 परीक्षा केंद्रांवर 3 ते 23 मार्च या काळात परीक्षा घेण्यात आली. कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्येमुळे भूगोल विषयाची रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचे विभागीय मंडळांमधील संकलनाबाबत मोठी समस्या निर्माण झाली होती. शिवाय गुणदानाबाबतही मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचे रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोलच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले़ दरम्यान, मागील वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल घोषित केला होता.                                                                              ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन  http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.                                                                                                                                         मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.                        मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.                                                                                      निकाल येथे उपलब्ध :  www.mahresult.nic.in,  www.sscresult.mkcl.org     www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in (महासंवाद)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *