Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा सळसळ पानाची हुरहुर…KavyaSuman

सळसळ पानाची हुरहुर…KavyaSuman

124

सळसळ सळसळ पानाची हुरहुर मनाची
जरी दूर दूर तू भासतेस अवती भवती

गंधाळला आसमंत प्रीत पावलांनी
कोकिळसूर गुंजे हिरव्या आम्रवनी
झुळूक गार शहारली तनू रोमांचली
मनमोहोर चुंबते धुंद श्वासांनी

हा श्रावण खुणावतो मला की कुणाला
श्रावण हा वेडावतो मला की कुणाला
मन कसे बहरले…रोमांचले…किती
हळूवार गुज प्रीतित मी बावरी बावरी

पारिजात