इयत्ता10 निकालात मुलींचीच बाजी

पश्चिम महाराष्ट्र

पुणे : राज्याचा दहावीचा निकाल [ssc result] 95.30 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. निकालात कोकण विभागाने पहिला क्रमांकावर असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. सन 2019 मधील निकाल 77.10 टक्के इतका होता. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले. यंदाही निकालात मुलींची बाजी असलेली पाहायला मिळत आहे. यंदा 96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्यांनी जास्त आहे.
विभागनिहाय टक्केवारी अशी
पुणे : 97.34 टक्के
नागपूर : 93.84 टक्के
औरंगाबाद : 92 टक्के
मुंबई : 96.72 टक्के
कोल्हापूर : 97.64 टक्के
अमरावती : 95.14 टक्के
नाशिक : 93.73 टक्के
लातूर : 93.09 टक्के
कोकण : 98.77 टक्के
महत्त्वाच्या बाबी
परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 84 हजार 264 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 74 हजार 103 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 15 लाख एक हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. (95.30 टक्के)
एकूण 18 लाख एक हजार 565 नोंदणी फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी 17 लाख 92 हजार 264 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक लाख 35 हजार 991 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. (75.86 टक्के निकाल)
सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे. एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *