Home राष्ट्रीय राफेलचा भारतभूमीला स्पर्श

राफेलचा भारतभूमीला स्पर्श

67

नवी दिल्ली : फ्रान्समधून रविवारी निघालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांनी बुधवारी दुपारी दुपारी 3.15 च्या दरम्यान अंबाला हवाईतळावर भारतभूमीला स्पर्श केला. तत्पूर्वी आकाशात असताना सर्वात प्रथम अरबी समुद्रातील भारतीय नौदलाच्या आएनएस कोलकाताशी संपर्क साधला. यानंतर ताफ्याने भारतीय हवाईक्षेत्रात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन सुखोई-30 लढाऊ विमाने सज्ज होती.
राफेल विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या अल धाफ्रामधून जवळपास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले होते. साधारण: दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी राफेलने अंबाला तळावर लँडिंग केले. यावेळी आसपासच्या चार गावांत कलम 144 लागू केले होते.
सामर्थ्यात वाढ
राफेलच्या आगमनानंतर निश्चितच भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ होणार आहे. राफेलने लांब अंतरावर क्षेपणास्त्र सहज प्रक्षेपण केले जाऊ शकतात. हे लढाऊ विमान हवाई हल्ल्यांमध्ये सर्वात प्रभावी ठरणार आहे. भारतीय हवाई दलाकडे एकूण 36 राफेल येणार असून ते पु़ढील दोन वर्षात मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वायुसेनेकडे सध्या सुखोई, मिराज 2000, मिग -29, जॅग्वार, एलसीए आणि मिग -21 अशी लढाऊ विमान आहेत. या व्यतिरिक्त वाहतुकीसाठी चॉपर्स आणि हेलिकॉप्टर देखील आहेत. (प्रतिकात्मक छायाचित्र)