Home राजधानी मुंबई पाच लाख मेट्रिक टन युरियाची केंद्राकडे मागणी

पाच लाख मेट्रिक टन युरियाची केंद्राकडे मागणी

70

मुंबई : राज्यात युरिया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रिक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकºयांना युरिया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिला.
राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत असल्याने युरियाचा वापर वाढला आहे.
राज्यातील खतांची परिस्थिती पाहून केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती; परंतु राज्याला केवळ १५ लाख मेट्रिक टन युरिया पुरवठा झाला आहे. उर्वरित साठाही उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
राज्यात मागील १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरियाचे ट्रॅकींग केले जात असून एखाद्या शेतकºयाला ज्याप्रमाणात युरिया विक्री झाली त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे़ साठेबाजीमुळे ज्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. शेतकºयांनी खतांचा संतुलित वापर करण्यासाठी जाणीवजागृती मोहिम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here