नवी दिल्ली : पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी आता 10 आॅगस्टपर्यंत प्रलंबित आहे. यात केंद्रीय गृहमंत्रालयाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून दिला आहे. तोपर्यंत परीक्षा घेण्याच्या विषापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली; पण कुठलाही अंतरिम आदेश देणार नसल्याचे स्पष्ट करत ही मागणी फेटाळून लावली.
देशभरातून दाखल झालेल्या चार याचिकांवर या प्रकरणात सुनावणी झाली. यातील एक याचिका युवासेनेच्या वतीने दाखल करण्यात आली आहो. याचिकाकर्ता यश दुबे यांच्यासाठी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यूजीसीने एप्रिलमधील गाईडलाईन्स नंतर बदलल्या़ हा बदल विस्कळीतपणे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय अनेक शाळांमध्ये आॅनलाईन परीक्षांसाठीच्या पायाभूत सुविधाच नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.