बी अलर्ट: पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी

राजधानी मुंबई

मुंबई : आपल्या पाल्याचे आभासी अपहरण [fake kidnapping] करून खंडणीची मागणी करणाºया सायबर गुन्हेगारी क्षेत्रातील भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यात आरोपी आधी सोशल प्रोफायलिंग करून शक्यतो नोकरी करणाºया जोडप्यांना लक्ष्य करत असतात. अशावेळी त्यांचे पाल्य एकटे असल्याचा फायदा घेतला जातो. सायबर भामटे विविध ‘सोशल मीडिया’द्वारे अशा पाल्यांशी मैत्री करतात. त्यांचे छायाचित्र, पालकांची माहिती मिळवतात. त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात़ त्याच सुमारास सदर पालकांस खोटे व्हिडिओ बनवून किंवा फेक फोटो बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा संदेश पाठवतात. यानंतर पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी सांगितलेल्या बँक खात्यात जमादेखील करतात. (याठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसवले जाते.) अपहरणाचा आभास निर्माण केल्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात भरण्यास सांगितले असल्याने पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.
वरील नमूद प्रकार विदेशात जास्त होत असले तरी आपणही सतर्क राहणे जरुरीचे आहे. त्यामुळे पाल्याकडे शक्यतो साधा फोन द्यावा. त्यामुळे तो जास्त सोशल मीडियावर वावरणार नाही आणि भामट्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल. तसेच, अशा प्रकारचे संदेश आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक ठाण्यात नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *